जळगाव (प्रतिनिधी) – येथील महात्मा फुले बहुद्देशीय समाज विकास संस्था, अयोध्या नगरतर्फे रविवारी १६ जुलै रोजी सकाळी संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आले आहे. समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे.
महात्मा फुले बहुद्देशीय समाज विकास संस्था, अयोध्या नगरतर्फे सकाळी ९ वाजता पालखी व दिंडी सोहळा अयोध्या नगरातील परिसरातून काढण्यात येणार आहे. मातोश्री हाईट्स, म्हाडा कॉलनी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होईल. यानंतर दिलीप महाराज जळगावकर यांचे कीर्तन होणार आहे. १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
समाजबांधवांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन नंदू पाटील यांनी केले आहे.