गुरुवारी, दुपारी 2 वाजता संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ.उल्हास पाटील, अधिष्टाता डॉ. एन एस आर्विकर, वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्या उपस्थीतीत या केंद्राचे उदघाटन होणार आहे. केंद्राच्या माध्यमातून एचआयव्ही बाधित व्यक्तींना राष्ट्रीय एडस नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व मार्गदर्शन तसेच मोफत औषध दिले जाणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून जिल्हयातील एचआयव्ही बाधित व्यक्तींना दिलासा मिळणार असून लोक आग्रहास्तव हे सेंटर सूरू करण्यात येणार असून जास्तीत जास्त रूग्णानी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.