भुसावळ येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) – येथील एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला अज्ञात व्यक्तीने मेसेज पाठवून यात स्टेट बँकेच्या अकाउंटचे केवायसी अपडेट करण्याचा मेसेज आल्याने त्यातील लिंक ओपन करून माहिती भरल्यानंतर खात्यातून एक लाख रुपये काढले गेल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जामनेर रोड वरील पंढरीनाथ नगर येथील रहिवासी असलेले सेवानिवृत्त कर्मचारी गौतम नामदेव खरे वय 63 हे वास्तव याला आहेत. गौतम खरे यांना 22 जानेवारी 2023 रोजी एका मोबाईल वरून मेसेज आला की आपले स्टेट बँक ऑफ इंडियाचे अकाउंट केवायसी अपडेट करायचे आहे त्यासाठी खालील लिंक ओपन करून माहिती भरावी असा तो मेसेज आल्याने गौतम खरे यांनी लिंक ओपन करून सर्व माहिती त्यात भरली. मात्र त्यांच्या अकाउंट मधील एक लाख रुपये अज्ञात व्यक्तीने परस्पर काढल्याचा प्रकार प उघडकीस आल्याने खरे यांनी पोलीस स्टेशनला धाव घेत अज्ञात व्यक्ती विरोधात बाजारपेठ पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड करीत आहे.