सावदा, ता. रावेर ( प्रतिनिधी ) – शहरात मोटारसायकलवरून जाणार्या तरूणावर चाकून हल्ला करून त्याच्याकडचा मोबाईल हिसकावल्याची घटना घडली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावदा शहरातील रहिवासी अर्शद बासीद खाटीक (वय -३४) याने पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. यानुसार फिर्यादी २ जुलै रोजी रात्री आठच्या सुमारास थोरगव्हाण येथून सावदा येथे येत होता. यानंतर अचानक मागच्या बाजूने पॅशन प्रो या मॉडेलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्याच्यावर चाकूने हल्ला करून त्याच्याकडचा ओपो एफ-२१ हा स्मार्टफोन घेऊन पळ काढला.
या प्रकरणी अर्शद बासीद खाटीक ( रा. रजानगर, सावदा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन अज्ञात व्यक्तींच्या विरोधात भादंवि कलम ३९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक विनोद खांडबहाले हे करीत आहेत.