देवरे हेल्थकेअर फाऊंडेशनचा उपक्रम
चाळीसगाव (प्रतिनिधी) – देवरे हेल्थकेअर फाऊंडेशन, दहिवद व शारदा नेत्रालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी मोफत भव्य नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबाराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरासाठी धुळे येथील शारदा नेत्रालय चे सर्व डॉक्टरांची टीम सर्व यंत्रनेसह हजर होती.
सामाजिक बांधिलकी जपून देवरे हेल्थकेअर फाऊंडेशन तर्फे दहिवद गावातील व परिसरातील गरीब व गरजु लोकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरासाठी दहिवद येथील पोलिस पाटील आबासो. विश्वासराव वाघ कार्यक्रमास अध्यक्षस्थानी उपस्थित होते. शिबिराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन देवरे हेल्थकेअर फाऊंडेशन चे मार्गदर्शक अशोक देवरे यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवरे हेल्थकेअर फाऊंडेशन चे अध्यक्ष मयुर देवरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी गावातील सर्व नागरीक हजर होते, कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडणेसाठी देवरे हेल्थकेअर फाऊंडेशन चे प्रतिक भोसले, रोहित देवरे,समाधान वाघ,गणेश वाघ,अर्जुन मोरे,संदिप वाघ, मिनाताई देवरे,रुपाली देवरे,जयश्री देवरे तसेच सर्व पदाधिकारी यांचे शिबिरास मोलाचे सहकार्य लाभले.
शिबिरामध्ये 180 रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यापैकी 56 रुग्णांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी धुळे येथे शारदा नेत्रालयात विविध तपासण्या व शस्त्रक्रिया नियोजित तारखेनुसार मोफत केले जाणार आहेत.
या शिबिर साठी शारदा नेत्रालय धुळे येथून डॉ.राहुल राजपूत, डॉ.जितेंद्र पाटील, अमोल वानखेडकर, योगेश कुलकर्णी, अमोल रणदिवे यांनी सर्व रुग्णांना अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले व आपल्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी या संदर्भात रुग्णांना समजविण्यात आले.
तसेच गावातील सर्व ग्रामस्थ व वरिष्ठ मंडळीचा शिबिरासाठी उत्फुर्त प्रतिसाद बघून शारदा नेत्रालय परत एकदा गावात शिबीर आयोजित करू असा विश्वास दर्शविला आहे. देवरे हेल्थकेअर फाऊंडेशन तर्फे शिबीरासाठी आलेल्या सर्व डॉ.व गावकऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले.