डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व धमार्थ रूग्णालयाचा उपक्रम
जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व धर्मदाय रूग्णालयात आजपासून ४ जूलैपर्यंत मोफत मेडिसिन,मानसोपचार, बालरोग आणि अस्थीरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात मणका,फ्रॅक्चर,सायटीका, गादीचे आजार, कंबरदुखी, पाठदुखी, इ तर मेडीसिन विभागात दारूमूळे होणारे लिव्हर,पोट व अन्ननलिकेचे आजार, तसेच लकवा, पॅरेलॅसिस, ब्रेन हॅमरेज, किडणीविकार, याचबरोबर बालरोग विभागात कमी वजनाचे व अपुरे दिवसाचे बाळ, जन्मदोष, फुफुस्साचे आजार, लहान मुलांमधील न्युमोनिया, टायफाईड, व सर्व प्रकारचे आजार, मानसोपचार विभागात अर्धशिशि, डोकेदुखी, फिटस, स्मृतीभ्रंश, व इतर समस्याची मोफत तपासणी अस्थीरोग, मेडिसिन, बालरोग व मानसोपचार तज्ञांकडून करण्यात येणार आहे. अस्थीरोग व बालरोग शस्त्रक्रिया देखिल मोफत केल्या जाणार आहे. याचबरोबर तज्ञांच्या सल्ल्यानुसार दाखल झालेल्या रूग्णांचा एम आर आय मोफत केला जाणार आहे.
या शिबिरासाठी चारही विभागाच्या तज्ञांची टीम कार्यरत असून अतिदक्षता,लहान मुलांसाठी अतिदक्षता, सर्जीकल अतिदक्षता विभाग सज्ज करण्यात आले असून अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर तसेच प्रशस्त वार्डची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशिक्षीत परिचारीकांची देखिल नियुक्ती करण्यात आली असून नोंदणी ३ जूलै पर्यंत करता येणार आहे. अस्थीरोग रूग्णांनी डॉ. चाणक्य ८६९८३२३२८९,बालरोग डॉ. चंदाराणी ९३०९७०७३९२, मेडीसिन डॉ मोमीन ८६२०००९००१ तसेच मानसोपचार डॉ. आदित्य ९४०४४ ७६१११ यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.