औरंगाबाद (वृत्तसंस्था) – तबलिकी जमातमुळेच औरंगाबाद शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला, असा दावा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पैठण येथे केला आहे. आज पैठण येथील ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण पथक रुग्णालयातील डाँक्टरांना राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, माजी खासदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, यांच्या हस्ते कोरोना PPE किटचे वाटप करण्यात आले. यावेळी खासदार खैरे बोलत होते.
औरंगाबाद जिल्ह्यातील कुठल्याही तालुक्यात कोरोना नाही. मात्र औरंगाबाद शहरात तबलिकी जमातीने घुसखोरी केल्यामुळे शहरात कोरोना पसरला आहे. कन्नड येथे तबलिकी जमातीचे नागरीक होते. मी स्वत: हा प्रशासनाला कळवल्यानंतर ते निघुन गेले. नागरिकांनी घाबरु नये, काळजी घ्यावी, जास्तीत जास्त मास्कचा वापर करावा. शिवसेना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे खैरै म्हणाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, तालुका प्रमुख आण्णासाहेब लबडे, शहरप्रमुख तुषार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.