जळगाव (प्रतिनिधी) – गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग प्रात्याक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते.
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रागंणात सकाळी ७ वाजता कार्यक्रमास सुरुवात झाली. याप्रसंगी गोदावरी अभियांत्रिकीचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, योगशिक्षक कृष्णाजी खडसे, प्रा. महेश एन पाटील सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक वर्ग तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थीत होते.योग प्रात्याक्षिकासाठी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा.महेश एन पाटील व कृष्णाजी खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थी व प्राध्यापकवृंद यांनी योग प्रात्याक्षिक केले. तत्पूर्वी कृष्णाजी खडसे यांनी योगाभ्यास, योगासने याबद्दल इत्यभुंत माहिती सर्वांना दिली. यात त्यांनी सूर्यनमस्काराचे फायदे व प्रात्यक्षिक करून दाखवले.
ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, बद्धकोणासन, व्रजासन, मंडुकासन तसेच प्राणायाममध्ये कपालभाती,अनुलोम विलोम, भ्रामरी हे आसन करुन घेतली. तसेच योगासने केल्याने होणारे फायदे यावर प्रकाश टाकला. यामध्ये आजच्या आधुनिक युगात व्यग्रतेमध्येही योगासने शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. असेही त्यांनी सांगितले. सदर उपक्रमाबाबत गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील व सदस्य डॉ. केतकी पाटील यांनी कौतुक केले.या उपक्रमात महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांसह सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. डॉ. उल्हास पाटील सीबीएसई स्कुल सावदा, भुसावळ, डॉ. उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी,अन्न व तंत्रज्ञान, तसेच कृषि महाविद्यालय, डॉ.उल्हास पाटील विज्ञान, विधी, महाविद्यालय, डॉ वर्षा पाटील इन्स्टीटयुट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, गोदावरी आय एम आर महाविद्यालय, गोदावरी इग्लिश मिडीयम स्कुल, हरीभाउ जावळे इन्स्टीटयुट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ होम सायन्स येथेही साजरा करण्यात आला.