जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील शाहू नगरात राहणाऱ्या तरूणाचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना कालिंका माता मंदीर परिसरात बुधवारी २१ मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली आहे. शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम होते.
शेख समीर शेख राज मोहम्मद (वय-२२) रा. इंदिरा नगर, शाहू नगर, जळगाव असे मृत झालेल्या तरूणाचे नाव आहे. बांधकामाच्या ठिकाणी मिस्तरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. सध्या खेडी शिवारातील कालिंका माता मंदीर परिसरात आशुतोष पाटील यांच्याकडे बांधकामाचे काम सुरू होते. बुधवारी २१ मे रोजी दुपारी १ वाजता बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या बोरींगच्या वायरचा स्पर्श झाल्याने शेख समीर याला जोरदार वीजेचा धक्का बसला.
त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर स्थानिक नागरीक व बांधकाम करणारे कामगारांनी धाव घेत वीजपुरवठा बंद करून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. यावेळी जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम होते. शेख समीर याच्या पश्चात आई, भाऊ, एक विवाहित बहीण असा परिवार आहे.