चोपडा (प्रतिनिधी) – भारतीय डाक विभागाने खास महिलांकरिता बचतीची आणि सर्वात जास्त व्याजदराची नवीन योजना सुरू केली असून फक्त दोन वर्ष कालावधीसाठी हि महिला सन्मान बचत योजना आहे. योजनेची सविस्तर माहिती चोपडा पोस्ट ऑफिसचे पोस्ट मास्तर मनोज पाटील व भूषण सैंदाने डाक निरीक्षक, यावल विभाग यांनी तालुक्याच्या आ. लताताई सोनवणे व प्रा. चंद्रकांत सोनवणे यांची भेट घेऊन त्यांना महिला सन्मान बचत पत्र याविषयी सविस्तर माहिती दिली व त्यांनी तालुक्यातील सर्व महिलांना जास्तीत जास्त महिला बचत सन्मान खाती उघडावी याबद्दल आवाहन केले.
केवळ महिलाच गुंतवणूक करू शकतात. महिला सन्मान बचत प्रमाणपत्रावर केवळ दोन वर्षात ७.५ टक्के व्याज दिले जाईल. योजनेची अधिक माहिती मिळवण्याकरिता चोपडा टपाल कार्यालयास संपर्क साधावा असे आवाहन चोपडा डाक घराचे पोस्टमास्तर मनोज पाटील यांनी तालुक्यातील महिलांना आवाहन केले आहे. सदर योजनेला तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळत असून चोपडा तालुका भुसावळ डाक विभागात प्रथम क्रमांक राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.