जामनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील एकाच गावात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या संदर्भात पहुर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील एका गावात दोन १७ वर्षीय अल्पवयीन मुली शेजारी राहतात. दरम्यान गावातील राहणारा तुषार अलाउद्दीन तडवी याने या दोन्ही मुलींना काहीतरी फूस लावून अपहरण करून पळवून नेल्याची घटना घडली. हा प्रकार घडल्यानंतर पीडित मुलींच्या नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, परंतु त्या कुठेही मिळून आल्या नाही, अखेर शनिवारी १७ जून रोजी रात्री १० वाजता पहूर पोलीस ठाण्यात एका मुलीच्या आईने धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी तुषार अल्लाउद्दीन तडवी याच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भरत लिंगायत करीत आहे.