चोरट्यांचा मोर्चा मंदिरांकडे
एरंडोल (प्रतिनिधी) – दशमाता मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या भिंतीला तोडून चोरटयांनी आत प्रवेश करून दशामाता देवीच्या अंगावरील सोन्या चांदीचे आभूषणे, दानपेटीतील रक्कम असा एकूण ३ लाख रुपयांचा ऐवज चोरटयांनी चोरून नेला आहे. हा प्रकार १६ रोजी सकाळी उघडकीस आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. एरंडोल पोलीस स्टेशनला गुणध दाखल करण्यात आला आहे.
पद्मालय रोडवरील बारा ज्योतिर्लिंग महादेवाच्या बाजूला दशमाता मंदिर आहे. तेथे मागच्या भिंतीच्या विटांचा चौरस करून मंदिरात चोरटयांनी प्रवेश करीत मंदिरातील लोखंडी कपाटातील १५ हजारांची रोकड, १०० रुपये दराच्या ३०० नोटा असा एकूण ३० हजारांची रोकड, देवीच्या कानातील ५ ग्राम वजनाचे कानातील सोन्याचे टोंगल १५ हजार रुपयांचे, देवीचे चांदीचे आभूषणे ५० पाळणे ,प्रत्येकी ३ भार एकूण दीड किलो वजनाचे ४५००० हजार रुपयांचे, देवीच्या चांदीच्या मूर्ती ४ अंदाजे प्रत्येकी १० भार, असे एकूण ४० बार अंदाजे १२ हजार रुपये, मंदिरात ठेवलेल्या दानपेटीमधून एका पेटीतील मोजून ठेवलेले ३१ हजार रुपये, व १२ हजार असे एकूण ४३००० रुपये असा सर्व एकूण २ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरटयांनी चोरून नेला. याबाबत नागदुली येथे राहणारे पुजारी विलास मंगल महाजन (वय ३३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ चंद्रकांत पाटील करीत आहे.