फैजपूर येथील महाविद्यालयात झाला कार्यक्रम
यावल (प्रतिनिधी) – तालुक्यातील फैजपूर येथील धनाजी नाना संस्थेच्या महाविद्यालयात राष्ट्रीय सण उत्सव समितीतर्फे लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. प्रसंगी युवा नेते धनंजय चौधरी व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनी तरुण अवस्थेतच राजकारणात आपली चुणूक दाखवित महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय दिशादर्शक असे कार्य केले आहे. जनतेच्या हितासाठी सदैव तत्पर असलेल्या नेतृत्वाचा सन्मान म्हणुन आज त्यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. प्रसंगी राष्ट्रीय युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस युवा नेते धनंजय चौधरी, तापी परिसर विद्या मंडळ संस्थेचे उपाध्यक्ष एस.के.चौधरी, चेअरमन लीलाधर चौधरी, संस्थेचे पदाधिकारी नंदकुमार भंगाळे, एम.टी. फिरके, के.आर. चौधरी, संजय चौधरी, प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सण उत्सव समिती प्रमुख डॉ.एस.एल. बिऱ्हाडे, लेप्ट.डॉ.राजेंद्र राजपूत, शेरसिंग पाडवी, राजेंद्र तायडे,ललित पाटील, प्रमोद अजलसोंडे, पवन अजलसोंडे, शेखर महाजन, नितीन सपकाळे, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी मोलाचे सहकार्य केले.