जळगाव(प्रतिनिधी) – शहरातील पिंप्राळा परिसरातील कलादर्शन ड्रॉईग क्लासेस तर्फे पु. ना. गाडगीळला दि.16 जुन पासून चित्रकला प्रदर्शनचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शन सोहळ्याचे उदघाटन आमदार सुरेश भोळे (राजू मामा), चोपडा येथील ललित कला केंद्राचे निवृत्त प्राचार्य राजेंद्र महाजन, पु.ना.गाडगीळ चे व्यवस्थापक संदीप पोतदार, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, समाजिक कार्यकर्ता प्रकाश बालाणी, नगरसेविका शोभाताई बारी, नगरसेवक सुरेश सोनवणे, दीपस्तंभ क्लासेसचे संचालक यजुर्वेद महाजन, नृत्य दिग्ददर्शक नरेश बागडे, कलादर्शन ड्रॉईग क्लासेसचे संचालक विजय चव्हाण उपस्थित राहणार आहे.
प्रदर्शन सोहळ्यात कलावंत दक्ष पाटील, चैतन्य पाटील, सार्थक जैन, राजेश्वरी साळवी यांनी साकारलेल्या विविध प्रकारच्या पेटिंग लावण्यात येणार आहे.
प्रदर्शन सोहळा दि.16 ते 30 जुन पर्यत सुरु असून नागरिकासाठी सकाळी 1 1 ते रात्री 8 वाजेपर्यत खुले ठेवण्यात आले असून चित्रप्रेमीनि व कलावतांनी भेट द्यावी असे आवाहन विजय चव्हाण यांनी केले आहे.