जळगाव ;-येथील सन ऑफ सिद्धार्थ बहुउद्देशीय संस्थेतर्फे तथागत भगवान गौतम बुध्द यांची २५६४ वी जंयती लॉक डाऊनचे नियम पाळून रिपब्लीकन पार्टी अॉफ इंडिया (आठवले )जळगांव जिल्हाध्यक्ष आयटी सेल मिलींद तायडे यांच्या हरी विट्ठल नगर येथे साजरी करण्यात आली . सर्व प्रथम बुद्धाच्या मूर्तीची पूजा संस्थेचे अध्यक्ष मिलींद तायडे यांनी मेणबत्त्या लावून केली. यानंतर बुद्धांनी दिलेल्या मार्गाचा अवलंब मानव जातीने करावा असे आज जगाला युद्धाची नव्हें तर बुद्धांची गरज असल्याचे सांगत त्यांची प्रवचने आणि त्यांनी घालून दिलेले विहाराचे नियम पवित्र मानून ते त्यांच्या अनुयायांनी गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर संकलित केले. गौतम बुद्धांच्या मानल्या जाणाऱ्या विविध शिकवणुकी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठांतराद्वारे सुपूर्द होत गेल्या. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर साधारण ४०० वर्षांनंतर ही शिकवणूक लेखी स्वरूपात प्रथम मांडली गेली. गौतम बुद्धांचे सर्व तत्वज्ञान हे पाली भाषेमध्ये मांडला गेलेला आहे . त्यांच्या या तत्त्वज्ञानाची माहिती मिळते भारत हे बौद्ध धर्माची मूळ भूमी असले तरी भारताबाहेर रे मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार घडून आला . आजही अनेक देशांमध्ये बौद्ध धर्म हा खूप चांगल्या स्थितीमध्ये असलेला पाहायला मिळतो . मात्र भारत ही बौद्ध धर्माची मूळ भूमी असतानाही या भूमीपासून काहीसा तो दुरावलेला दिसतो . मॅनमार कंबोडिया व श्रीलंका या देशांमध्ये या धर्माचा खूप मोठा प्रभाव आजही आपल्याला कायम असलेला दिसून येतो असे मार्गदर्शनपर बोलताना श्री.तायडे यांनी यावेळी आपले विचार मांडले . यावेळी उपाध्यक्ष युवराज सोनवणे,सचिव मधूमला तायडे,युवा जिल्हा उपाध्यक्ष शंकर भोसले, यांच्या उपस्थितीत खिर दान करण्यात आली . यावेळी रमेश पाटील, सदस्या प्रिया केदार,शोभा पातुडे,नुतन केदारी,रोहिणी वाघोदकर, सरला पाटील,मैना निकम,तुषार तायडे,सोपान पाटील,ज्ञानेश्वर पाटील,सुयोग पातुडे आदी उपस्थित होते.








