चोपडा तालुक्यातील धक्कादायक घटना
चोपडा (प्रतिनिधी) : लहान मुलांना मोबाईल देणे किती घातक ठरू शकते, याबाबतचे उदाहरण आपण ऐकले असतील. असेच एक उदाहरण जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात घडले आहे. मोबाईलच्या व्यसनामुळे कमी वयात परिपक्वता आलेल्या एका १३ वर्ष ९ महिन्याच्या मुलाने गावातीलच ६ वर्ष १० महिन्याच्या बालिकेवर बलात्कार केल्याची घटना उघडकिस् आली आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ५४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. घटनेतील पीडिता आणि संशयित आरोपी हे एकाच गावातील रहिवासी आहेत. गुरुवारी ८ जून रोजी संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा वाजेच्या दरम्यान गावातील एका घराच्या गच्चीवर असणाऱ्या खोलीत संशयित मुलाने सदर बालिकेला बॉल देण्याचे आमिष दाखवून घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. बालिकेच्या आजीच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेबाबत तपासाधिकारी देखील चक्रावून गेले असून मोबाईलच्या व्यसनामुळे परिपक्वता आल्याने सदर मुलाने हे कृत्य केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याला मोबाईल किती वेळ द्यावा आणि तो त्याच्यावर काय पाहतो याकडे लक्ष देणे गरजेचे झाल्याचे यातून दिसून येत आहे.