जळगाव ;- गणेशवाडीतील रहिवासी आणि राजस्थान सिमेंटचे संचालक बिरबलराम शर्मा यांनी सामाजिक बांधिलकीमधून एमआयडीसी पोलिसांच्याहस्ते गरजु नागरिकांना किराणा साहित्यांचे वाटप केले . आज ७ रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पीएसआय विशाल वाठोरे ,पीएसआय विशाल सोनवणे , सहाय्य्क फौजदार अतुल वंजारी, हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राठोड , पोलीस नाईक प्रकाश पवार ,जितेंद्र राजपूत, पोलीस मित्र फुलारी , योगेश पाटील आदींच्याहस्ते किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले . या किराणा साहित्यात गहू ,तांदूळ,तेल ,डाळ , साबण, आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता .







