जळगाव (प्रतिनिधी) – ब्लोगिंगचे किंग म्हणून ओळखले जाणारे बीडचे अक्षय रासकर यांनी गुरुवारी ८ जून रोजी ब्लॉगिंग क्षेत्रात नावलौकिक असलेली मुद्रा सोल्युशन्सला भेट दिली. याप्रसंगी त्यांनी वेबसाईट प्रोजेक्ट्साठी मार्गदर्शन केले.
अक्षय रासकर यांनी आपल्या शहरातील नामांकित डिजिटल मार्केटिंग आणि ब्लॉगिंग क्षेत्रात नावलौकिक असलेली मुद्रा सोल्युशन्सला भेट दिली. मुद्रा सोल्युशनच्या वतीने संचालक प्रतीक पाटील व अमित चौधरी यांनी त्यांचे जळगावकरांच्या वतीने स्वागत केले. ब्लॉगिंगचा वाढता कल बघता त्यांनी जळगावमध्ये भविष्यात करता येणाऱ्या कार्यक्रमाबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी प्रसिद्ध युट्युबर चेतन महाजन व विश्वजीत पाटील हे देखील उपस्थित होते.
अक्षय रासकर यांनी मुद्रा सोल्युशनचे सुरू असलेले ब्लॉगिंग आणि वेबसाईटच्या प्रोजेक्टसाठी मार्गदर्शन केले व भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.