रावेर ( प्रतिनिधी ) – रावेर शहरात अष्टविनायक नगर व परिसरातील बंद दरवाजाची संधी साधून चार ते पाच ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून एका ठिकाणी सुमारे १७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
अष्टविनायक नगरातील रमेश चौधरी हे नागपूर येथे आपल्या मुलीकडे गेले होते . ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलुप तोडून घरातील कपाटातून दहा हजार रुपये रोख व सात हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. या बाबत चौधरी यांनी रावेर पोलीस स्टेशनला दिलेल्या माहितीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या कॉलनी परिसरातील . तीन – चार बंद घराचे कुलुप तोडले . मात्र या घरांचे घरमालक बाहेरगावी गेल्यामुळे चोरीचा तपशील समजु शकला नाही. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ईस्माईल शेख करीत आहेत.