मुंबई (वृत्तसंस्था) – शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येने १० हजाराचा टप्पा ओलांडलाय. कोरोनाग्रस्तांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या सरकारसाठी मोठा चिंतेचा विषय बनली आहे. मुंबईत कोरोनाचं संकट भीषण आणि गंभीर असल्याचं केंद्र सरकारनेही मान्य केलंय.

मुंबईत मे अखेरपर्यंत कोव्हिड-19 च्या रुग्णांची संख्या 75 हजारांवर पोहोचण्याची भीती केंद्र सरकारने व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) 1000 खाटांचं खास कोव्हिड-19 रुग्णालय आणि आयसोलेशन सेंटर उभारण्यास सुरुवात केली आहे. या सेंटरमध्ये सेमी-क्रिटिकल रुग्ण आणि कोव्हिड-19 पॉझिटिव्ह रुग्णांना ठेवण्यात येणार आहे.
वाचा – माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
वाचा – दारू विक्री, बांधकाम, सलून – लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
वाचा – कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
वाचा – उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
वाचा – कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
याबाबत बीबीसीशी बोलताना मुंबई मेट्रोपोलिटन रिजन डिव्हल्पमेंट अॅथॉरिटीचे (MMRDA) आयुक्त आर. ए. राजीव म्हणाले, “बीकेसीत 1008 बेड्सचं खास कोव्हिड-19 सेंटर उभारण्यात येणार आहे. हे सेंटर भारतातील पहिलं ओपन ग्राउंडवर बनवण्यात आलेलं सेंटर असेल. या सेंटरमध्ये रुग्णांसाठी ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात येणार आहे. येत्या 11-12 दिवसांत हे सेंटर पूर्णतः बनून तयार होईल. त्यानंतर हे सेंटर मुंबई महापालिकेला सूपूर्द करण्यात येईल.”
असं असेल कोव्हीड-19 सेंटर
MMRDAचे आयुक्त आर. ए. राजीव यांच्या माहितीनुसार,
1) कोव्हिड-19 सेंटर 1008 खाटांचं असेल
2) यातील 50 टक्के म्हणजेच 504 खाटांना ऑक्सिजन सप्लाय असेल
3) रुग्णांना पाईपद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येईल
4) 58 नॉन-आक्सिजन खाटांचं एक क्युबिकल असेल
5) ऑक्सिजन सप्लाय असलेल्या 28 खाटांचं एक क्युबिकल असेल
6) या सर्वांसोबत वॉशरूम आणि टॉयलेट अटॅच असणार
7) 1.25 लाख फूट जागेवर हे सेंटर उभारण्यात आलंय
8) 40 मीटर रुंद आणि 240 मीटर लांब एवढा याचा आकार आहे
9) रुग्णांसाठी इन हाऊस किचन असणार आहे
10) तसंच पार्टिशनची व्यवस्थाही करण्यात येणार आहे
कोणत्या रुग्णांना या सेंटरमध्ये ठेवण्यात येणार?
“या सेंटरमध्ये आयसीयूची व्यवस्था नसेल. कोव्हिड-19 चे सेमी-क्रिटिकल रुग्ण ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे. अशांना या सेंटरमध्ये ठेवण्यात येईल. त्याचसोबत, लक्षणं नसलेले म्हणजे ए-सिंप्टोमॅटीक रुग्ण, तसंच ज्यांना घरात जागा नसल्यामुळे होम-क्वारंटाईन करणं शक्य नसेल त्यांना इथं आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे,” अशी माहिती आर. ए. राजीव यांनी दिली.







