जळगाव (प्रतिनिधी) – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मार्थ रुग्णालयातर्फे बुधवार दि.३१ मे रोजी जळगाव जिल्ह्यात तीन गावांमध्ये भव्य आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील रुईखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत उद्या सकाळी १० वाजता, पाचोरा तालुक्यातील भोजे येथे महात्मा फुले हायस्कूल येथे व पारोळा तालुक्यातील चिखलोद व तांडा येथील व्यायाम शाळेत सकाळी ११ वाजता शिबिरास सुरुवात होणार आहे. शिबिरात रुग्णांची रक्तदाब तपासणी, ईसीजी कार्डिओग्राफ तपासणी तसेच कान नाक घसा विकार, डोळ्यांचे आजार, हाडांचे दुखणे-मणक्यांचे विकार, हृदयविकार, स्त्रीयांचे विकार, दारुमुळे उद्भवलेे आजार, मानसिक आजार, त्वचाविकार अशा विविध आजारांची तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जाणार आहे. ज्या रुग्णांना वैद्यकीय उपचाराची गरज तसेच शस्त्रक्रियांची आवश्यकता आहे, त्यांच्यावर डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत उपचार केले जाणार आहे. रुग्णांनी सोबत येतांना आधार कार्ड व रेशन कार्ड घेऊन यावे, या शिबिरासाठी स्थानिक ग्रामपंचायतीचे सहकार्य लाभत आहे. तरी समस्त ग्रामस्थांनी पंचक्रोशीतील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन गोदावरी फाऊंडेशनने केले आहे.
आरोग्य शिबिरास ग्रामस्थांचा प्रतिसाद
पाचोरा तालुक्यातील पिंप्री खुर्द तसेच सावखेडा येथील ग्रामपंचायत कार्यालयात तर वरखेडी ब्रुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत ग्रामपंचायत व गोदावरी फाऊंडेशनतर्फे मंगळवार दि.३० मे रोजी आरोग्य शिबिर भरविण्यात आले. येथे डॉ.मोहित, डॉ.गजानन, डॉ.संस्कृती, डॉ.शुभम, निवासी डॉ.उमेश, डॉ.प्राजक्ता, डॉ.गौतम, निवासी डॉ.सायली, डॉ.श्वेता, डॉ.साक्षी, डॉ.जान्हवी हे तपासणी करुन मार्गदर्शन करीत आहे. पिंप्री खुर्द येथील शिबिरासाठी सरपंच अमोल बाविस्कर, उपसरपंच कल्पनाबाई पाटील, सदस्य वंदना पाटील, संगीता पाटील, तुळसाबाई पाटील, अकीलाबाई तडवी, सावखेडा सरपंच सुमनबाई जीवन वाघ, उपसरपंच राजेश धना सोनवणे, साधन श्रीराम पाटील, मोतीलाल रुपचंद परदेशी, वरखेड बु्र. सरपंच सविता चंद्रकांत सोनवणे, उपसरपंच धनराज राजू पाटील, संजय लक्ष्मण पाटील आदिंचे अनमोल सहकार्य लाभले. काही रुग्णांना हर्निया, अल्सर, भगंदर, डायबेटिक फूट असे विकार आढळले. त्यांना लॅबोरेटरी तपासण्या तसेच रेडिओलॉजी तपासणी व शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात येण्याचा सल्ला व तारीख दिली आहे. तसेच वाहनव्यस्थाही गोदावरी फाऊंडेशनतर्फे उपलब्ध करुन देण्यात आली. सदर रुग्णांवर महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत उपचार केले जाणार आहे.