शेवटच्या क्षणापर्यंत रंगला अंतिम सामना
अहमदाबाद (वृत्तसंस्था) : प्रसिद्ध आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचे विजेतेपद अखेर चेन्नई सुपर किंग संघाने पटकावले. चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात गुजरात संघावर महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघाने पाच धावांनी विजय मिळविला. पावसामुळे एक दिवस उशिरा खेळला गेलेला सामना सोमवारी रात्री उशिरापर्यंत सामना सुरू होता.
गुजरात टायटन्स संघाने हार्दिक पांड्याचा नेतृत्वाखाली प्रथम फलंदाजी करताना चार गड्यांच्या मोबदल्यात २१४ धावा बनवला होत्या. मात्र रविवार प्रमाणे सोमवारी देखील पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावून अंतिम सामन्यात उत्कंठा शिगेला नेली. मात्र डीएलएस पद्धतीनुसार १५ षटकात १७१ धावांचे आव्हान चेन्नई संघाला देण्यात आले.
अशक्यप्राय वाटणारे हे आव्हान चेन्नई संघाला पेलवणार नाही असे वाटत असताना चेन्नईच्या फलंदाजांनी आक्रमक खेळ केला. सामनावीर देवान कॉन्वे यांनी ४७ धावांची मजबूत खेळी केली. इतर फलंदाजांनी देखील आक्रमक धावांची खेळी केली. दोन चेंडूत रवींद्र जडेजा याने अनुक्रमे सहा व चार धावांसाठी चेंडू फटकवल्यावर स्टेडियम मध्ये एकच जल्लोष झाला. चेन्नई सुपर किंग्स संघ विजेता ठरला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पाचव्यांदा हा संघ विजय झाला.
अनेक खेळाडूंसाठी आयपीएल २०२३ सीजन संस्मरणीय राहिला आहे. स्पर्धेत गुजरातचा खेळाडू शुभमन गिलने ऑरेंज कॅप जिंकली. त्याने १७ इनिंग्समध्ये ८९० रन केल्यात. तर सर्वाधिक बळी घेणाऱ्या मोहम्मद शमी यास पर्पल कॅप देण्यात आली. दिल्ली कॅपिटल्सने फेअरप्ले पुरस्कार जिंकला. गुजरात संघाचा रशीद खानने लखनऊ संघाचा खेळाडू काइल मेयर्सच्या झेलसाठी कॅच ऑफ द सीझनचा पुरस्कार जिंकला. शुभमन गिल (इमार्जिंग प्लेयर्स) सर्वात मौल्यवान खेळाडू ठरला.