भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यातील भुसावळ मुक्ताईनगर कडे जाणाऱ्या साईबाबा मंदिरापुढे ३८ वर्षीय इसमाचा दुचाकी स्लिप झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. घटना रविवारी २८ मे रोजी संध्याकाळी ५ घडली असून वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद किशन जगताप (वय ३८, रा. संत मीराबाई नगर, पिंप्राळा, जळगाव) असे मयत इसमाचे नाव आहे. ते रविवारी भुसावळ तालुक्यात होते. संध्याकाळी ५ वाजता मुक्ताईनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांची दुचाकी क्र. एमएच १९ ईडी ८७६३ हि घसरली. अपघातात त्यांना जबर मार बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी घनश्याम अमृत सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, स्वतःच्या मृत्यूस व दुचाकीच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याने चालक शरद जगताप यांचे विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोउनि इस्माईल शेख करीत आहे.