जळगाव ;– तालुक्यातील शिरसोली प्र. बो. गावातील बारी नगरातील रहिवाशी प्रवीण पांडूरंग खलसे ( बारी) या ३७ वर्षीय तरुणाने आज दुपारी त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रवीण बारी महावितरणला नोकरीला होता. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण लगेच समजू शकले नाही , त्यामुळे गावात खळबळ उडाली आहे. प्रवीण खलसे (बारी) यांच्या पश्चात आई, पत्नी,दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .