चोपडा (प्रतिनिधी) – तालुक्यात मालपूर कडून चोपडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका गुरे वाहून नेणाऱ्या वाहनावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. यातील गायी, वासरुंची मुक्तता करीत वाहन जप्त केले आहे.
पोहेकॉ लक्ष्मण त्र्यंबक शिंगणे यांनी फिर्याद दिली आहे. २० मे रोजी मध्यरात्री वाहन क्र. एम. एच. १८.ए ए ६९८९ पांढऱ्या रंगाची महिंद्रा कंपनीची पिकअप बोलेरोवरील वाहन चालक यांनी त्याचे ताब्यातील वाहनात ३ गुरे, एक वासरु अंदाजे किंमत ३५ हजार हे दाटीवाटीने त्यांना वेदना होतील अशा रितीने जखडून बांधून नेत होता. विनापरवाना अवैधरित्या कत्तल करण्याची उद्देशाने वाहतुक करताना मिळून आले आहे. वाहन चालक यांचेकडे वाहन चालवण्याचा कोणताही परवाना नव्हता.
याकरिता पोहेकॉ लक्ष्मण शिंगणे यांचे फिर्यादीवरून शत्रुघ्न नामदेवराव पाटील (वय ३६, बोरअजंटी ता. चोपडा) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सफौ किशोर शालीग्राम शिंदे करीत आहे.