मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – येथील महावीर नगर येथे चोरी करण्याचा चोरट्यांचा डाव घरमालकाच्या सतर्कतेमुळे फसला आहे. नागरिकांनी आसाम राज्यातील दोघा चोरट्याना पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रफुल्लकुमार मांगीलाल जैन (वय ६५, रा. महावीर नगर, मुक्ताईनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अज्ञात दोन चोरटयांनी बुधवारी १७ मे रोजी घराचे उघडे दार बघून आत घुसून चोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी घरमालक प्रफुल्लकुमार जैन यांना संशय आला. त्यांनी घरात बघितले असता, दोन इसम चोरीच्या उद्देशाने शिरलेले दिसले. त्यांनी आरडाओरडा करीत शेजारच्यांनी जमा केले. पोलिसांना फोन लावून माहिती दिली.
पोलिसांनी दोघं संशयित चोरट्याना ताब्यात घेऊन फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. मो. अफजल अली मो. अत्तार अली (वय – ३६) आणि रकीब अली नौशाद अली (वय – ३६) दोन्ही रा. रंगिया, जि. कामरूप, आसाम राज्य असे दोघी संशयित चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्यावर बोदवड पोलीस ठाण्यात १७ मे रोजी रात्री ८. ३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना उमेश महाजन करीत आहे.