पारोळा (प्रतिनिधी) – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती निवड एकमताने झाली. त्यात माजी राज्यमंत्री डॉ. सतीश पाटील हे सभापती तर उपसभापती सुधाकर पाटील यांची निवड झाली आहे. महाविकास आघाडीने एकहाती सत्ता मिळविले आहे.
प्रसंगी डॉ सतीश पाटील, ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख डॉ हर्षल माने, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पीरन अनुष्ठान यांच्यासह सर्व नूतन सदस्य यावेळी उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या बाजार समिती निवडणुकीत मविआने एकजुटीने लढत देत सेनेच्या ११ वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावत १८ पैकी १५ जागा विजयी करत एकतर्फी विजय मिळवला होता. निवडणुकीत माजी सभापती अमोल पाटील यांनी डॉ सतीश पाटील यांना थेट आव्हान दिले होते.
सभापती निवडीवेळी डॉ सतीश पाटील यांनी बोलताना सांगितले की, बाजार समिती ही शेतकऱ्यांची संस्था आहे. मागील काळात पदाचा दुरूपयोग करून काही गैर कामे झाली असतील तर आम्ही सर्व विषयांचा मागोवा घेऊन चौकशी लावू तसेच शेतकरी हित जोपसणारे जे मागतील त्यांना लायसन देऊ, ओपन लिलाव पद्धत सुरू करून इतर तालुक्यांचे भाव घेऊनच पारोळा येथे शेतीमालास भाव दिला जाईल ,कोल्ड स्टरेज साठी अभ्यास करून निर्णय घेऊ, शेतकऱ्यासाठी निवास व भोजन व्यवस्थेकडे लक्ष दिले जाईल,कापूस असो की कोणताही शेती माल खरेदी मध्ये टोकन पद्धत बंद केली जाईल, असे आपल्या मनोगतात सांगितले.