जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील शारदा कॉलनीत ७५ वर्षीय वृध्दाच्या गळ्यातील ३० हजार रूपये किंमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत अज्ञात चोरट्यांनी हिसकावून चोरून पसार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सोमवारी १५ मे रोजी रात्री ९ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रभावती नारायण काळे (वय-७५) रा. शारदा कॉलनी, महाबळ या वृध्द महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २७ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास वृध्द महिला ही घरासमोरील अंगणात साफसफाई करत होत्या. त्यावेळी एका अनोळखी तरुणाने त्यांच्या मागून येवून त्यांच्या गळ्यातील ३० हजार रूपये किंमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत जबरदस्तीने हिसकावली व पळून गेला. ही घटना घडल्यानंतर वृध्द महिला प्रचंड भेदरलेल्या असल्याने त्यांनी पोलीसात तक्रार दिली नव्हती. अखेर सोमवारी १५ मे रोजी रात्री ९ वाजता त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहिदास गबाले करीत आहे.