जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील कुसुंबा येथे महावितरणचा खांब पडल्याने शेतकऱ्याला वीज मिळेनाशी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांना वारंवार कळवूनही त्यांनी सपशेल दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
भिमसींग पाटील यांचे कुसुंबा येथे शेत आहे. तेथे त्यांच्या शेतात ऊस, रेशीम लावला आहे. २० दिवसांपासून विजेचा खांब अचानक कोसळल्याने वीज मिळणें शेतकऱ्यांना मुश्किल झाले आहे. तारा लोम्बकळत असून शेतात पसरल्या आहेत. यामुळे शेतातील पीक जळून राहिले आहे. उभा उसाचे पिकासह रेशीमबागेतील झाडे जळत आहे. गुरांना पिण्यासाठी पाणी शिल्लक नाही. याबाबत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. मात्र त्यांनी शेतकऱ्यांची कुठलीच दखल घेतली नाही. यामुळे शेतकरी संतप्त झालेले आहेत.
महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन शेतात पडलेला विजेचा खांब उचलून काम सुरळीत करावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.