पुणे (वृत्तसंस्था) – घरी रहा, सुरक्षित रहा, असे आवाहन वडगाशेरी मतदार संघाचे आमदार सुनिल टिंगरे यांनी नागरिकांना केले. आमदार टिंगरे व विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविंद्र कदम यांनी पायी चालून परिसराचा आढावा घेतला तसेच नियम पाळण्याचे आवाहनही नागरिकांना केले.
आमदार सुनिल टिंगरे व विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविंद्र कदम व पोलीस कर्मचाऱ्यांनी टिंगरे नगर व धानोरी भागात जनजागृती रॅली काढली होती. यावेळी टिंगरे यांनी चौका चौकात नागरिकांशी स्पिकरवरुन संवाद साधला. गर्दी टाळा, घरी रहा, अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, काळजी घ्या, अशा सूचना यावेळी पोलीस प्रशासनाने केल्या.