जळगाव (प्रतिनिधी) – दवाखान्यात उपचार घेण्यास जात असलेल्या वृद्धेस धडक देऊन गंभीर जखमी केल्याप्रकरणी इसमाविरुद्ध शहर पोलीस स्थानक येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशोदा सुखदेव साखला (वय ७०, शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्या १२ मी रोजी डॉ. महाजन यांचेकडॆ उपचारास जात होत्या. शिवाजी नगरातील कानळदा रस्त्यावर एका इसमाने (एमएच १९ सीवाय ८५२४) दुचाकीवरून जात असताना त्यांना धडक दिली. यात कमरेला मुक्कामार लागल्याने तसेच पायाला मार लागला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गणेश महाजन यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.