• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

चमत्कारांवर विश्वास ठेऊन बळी पडू नका : प्रा. कट्यारे

समाजकल्याण विभाग, महाराष्ट्र अंनिसतर्फे प्रशिक्षण शिबीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 13, 2023
in Uncategorized
0


जळगाव (प्रतिनिधी) – जगात चमत्कार नसतात. चमत्कारांवर विश्वास ठेऊन बळी पडू नका. आपल्या विवेकबुद्धीला घासून योग्य निर्णय घ्या. चमत्कारांची बुवाबाजी कमी होऊन आज मानसिक शोषणाची बुवाबाजी देशभरात धुमाकूळ घालीत आहे. तेव्हा, जनतेला अंधश्रद्धेच्या आजारापासून वाचविण्यासाठी सातत्याने प्रबोधन करावे लागणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प विभागाचे राज्य कार्यवाह प्रा. डी.एस. कट्यारे यांनी केले.

समाजकल्याण विभागचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जादुटोणाविरोधी कायदा व चमत्कार सादरीकरण एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर जिल्ह्यातील नागरिकांसाठी शनिवारी दि. १३ मे रोजी दिवसभर आयोजित करण्यात आले होते. यावेळी शिबिरात ते बोलत होते. सकाळी शिबिराचे उदघाटन समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. डी. एस. कट्यारे, समाजकल्याण विभागाचे लिपिक अरुण वाणी, अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चौधरी, प्रधान सचिव प्रल्हाद बोऱ्हाडे व विश्वजीत चौधरी उपस्थित होते. उदघाटन मंत्राद्वारे अग्नी प्रज्वलित करून करण्यात आले.

प्रस्तावनेतून शिबीर समन्वयक जितेंद्र धनगर यांनी शिबिर घेण्यामागील भूमिका विशद केली. देशभरात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणावर फोफावल्या असून त्याच्या निर्मूलनासाठी अंनिस कार्यकर्त्यांना बळ देणे गरजेचे आहे. चमत्कार सादरीकरण शिबिरातून शिकून ग्रामीण भागात जनजागृती करता येईल अशी प्रतिक्रिया डॉ. राकेश चौधरी यांनी व्यक्त केली. यानंतर जादूटोणाविरोधी कायद्याविषयी सविस्तर माहिती अंनिसचे कायदाविषयक सल्लागार ऍड. भरत गुजर यांनी दिली.

चमत्कारांमागील वैज्ञानिक दृष्टिकोन व हातचलाखी याबद्दल प्रा. कट्यारे यांनी माहिती दिली. आपण विचार न करता, बुद्धी न वापरता बुवांच्या म्हणण्याला सहज बळी पडतो. चमत्कारांच्या कथा खोट्या असतात. त्याला आव्हान दिले गेले पाहिजे. आता तर शासनाने विविध विभागही त्यासाठी सुरु केले आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रा. कट्यारे यांचेसह रवींद्र चौधरी, प्रल्हाद बोऱ्हाडे, भीमराव दाभाडे यांनी विविध चमत्कार करून त्यामागील सादरीकरण करून दाखविले.

यात हवेतून पैसे काढून दाखविणे, गडूतून भूत काढणे, पाण्याचा दिवा पेटविणे, रिकाम्या हातातून कुंकू काढणे, दोरीतील गाठ गायब करणे, कागदावर भूत आणून ते जाळून दाखविणे, मूर्ती दूध पिणे, अंगात येऊन जळता कापूर खाणे, मिडब्रेन भांडाफोड, कर्णपिशाच्च भूत, रिकाम्या तांब्यातून पाणी काढणे आदी चमत्कार दाखविण्यात आले. सहभागींनी देखील प्रात्यक्षिक करून घेत प्रशिक्षण घेतले.

शिबिराला समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांचे सहकार्य लाभले. शिबिरासाठी शहर कार्याध्यक्ष कल्पना चौधरी, शाखा प्रधान सचिव गुरुप्रसाद पाटील, प्रा. कल्पना भारंबे, शिरीष चौधरी, ऍड. डी. एस. भालेराव, रमेश गायकवाड यांचेसह अंनिसचे कार्यकर्ते, तालुका समन्वयक, कार्यालयीन कर्मचारी, समतादूत आदींनी परिश्रम घेतले.


 

 

Tags: #jalgaon anis newshttps://kesariraj.com/3-may-23-n-11/
Previous Post

कर्नाटक राज्यात कॉंग्रेस ची सत्ता : पाचोर्यात जल्लोष

Next Post

वावडदा शिवारात ४ लाखांचा ऊस जळून खाक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाचोऱ्यात कापड दुकानाला  भीषण आग ; लाखो रुपयांचे नुकसान

वावडदा शिवारात ४ लाखांचा ऊस जळून खाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon