जामनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील ढालगाव येथील तरूणाला चाकूचा धाक दाखवत त्याच्या आजीला दोन जणांनी शिवीगाळ केली. तसेच, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी १२ मे रोजी दुपारी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर संजय पवार (वय-२९) रा. ढालगाव ता. जामनेर हा तरूण शुक्रवार १२ मे रोजी सकाळी १० वाजता आजीसह चारचाकी वाहनाने जात होता. तेव्हा काहीही कारण नसतांना गावातील गोपाल विठ्ठल पवार आणि राजश्री गोपाल पवार यांनी ढालगाव ते ढालशिंगी रस्त्यावर सागरची गाडी आडविली. गाडीतील वृध्द आजी यांना लाठीकाठ्ठयांनी बेदम मारहाण केली. प्रतिकार करण्यासाठी सागर पवार याने मध्यस्थी केली. तर त्याला चाकूचा धाक दाखवून जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर तरूणाने पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. संशयित आरोपी गोपाल विठ्ठल पवार आणि राजश्री गोपाल पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हंसराज मोरे करीत आहे.