नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांना मोठे यश मिळाले आहे. हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा महत्वाचा कमांडर रियाज नायकू या चकमकीमध्ये ठार झाला आहे. भारतीय लष्कराने रियाजला पकडून देणाऱ्याला १२ लाखांचे बक्षिस देण्याची घोषणा केली होती.माहितीनुसार, आज सकाळपासूनच सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर रियाज याला कंठस्नान घालण्यासाठी भारतीय सुरक्षादलांनी येथील एका परिसराला वेढा घातला होता. याचवेळी झालेल्या चकमकीमध्ये रियाज मारला गेला. बुरहान वानीच्या मृत्यूनंतर हिज्बुल मुजाहिद्दीनने रियाजला कमांडर म्हणून नियुक्त केलं होतं.