पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा पिपल्स बॅक निवडणुक समाप्त झाली. एकतर्फी नुतन संचालक मंडळ विराजमान होऊन सुमारे साडेतीन वर्ष पुर्ण झाले.आता फक्त अवघे दिड वर्षं बाकी आहेत. विद्यमान संचालक मंडळाने निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान जुने रोजंदारी, मासीक पगार तत्वावर तात्पुरता स्वरूपातील कर्मचारी ठेवण्यापेक्षा नूतन पारदर्शक भरती करणार असल्याचे जाहीर केले होते. तब्बल विद्यमान संचालक विराजमान होऊन साडेतीन वर्षे झाले तरी अद्याप कोणत्याही नूतन नोकर भरतीच्या स्पेशल अधिकारी ,कर्मचारी भरती संदर्भात हालचाल करत नसल्याचे दिसत आहे.
त्यामुळे पाचोरा पीपल्स बँकेत मुख्य कार्यालयात गेल्यानंतर आपलेसे असणारे कर्मचारी व कोणीही अधिकारी अथवा कर्मचारी दिसून येत नाही. अर्थात भूमिपुत्रांना न्याय नाही. परिणामतः सभासद , ठेविदार, कर्जदारां मध्ये समाधानकारक सुर नाही. याचाच परिणाम पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राहुल अशोक सांगवी यांच्या विजयात मोठ्या प्रमाणावर दिसुन आला.
पाचोरा स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळण्यासाठी तसेच बँकेच्या हितासाठी बँकेमध्ये अष्टपैलू शैक्षणिक व योग्य ती पात्रता असलेले अधिकारी कर्मचारी शिपाई भरती तातडीने केली जावी व ही भरतीसह सेवा जेष्ठता करत असताना वशिलेबाजी न होता सेवा जेष्ठते सह बिंदू नामावलीचा कटाक्षाने विचार व पुर्तता करून नियमानुसार सर्व जाती- धर्मांच्या व्यक्तींना न्याय देण्यात यावा, अशी मागणी संदीप महाजन यांनी केली आहे.
तशा स्वरूपाचे निवेदन दिनांक ९ मे मंगळवार रोजी पाचोरा पीपल्स बँकेच्या मुख्य कार्यालयात दिल्या असून या निवेदनाची दखल न घेतल्यास २१ मे पासून सार्वजनिक आंदोलनाचा लोकशाही मार्गाने आंदोलन उभं करणार असल्याचा इशारा महाजन यांनी दिला आहे.