सावदा ( प्रतिनिधी ) – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल, सावदा येथील इयत्ता १२ वी परिक्षेचा निकाल लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
यात स्कूलची विद्यार्थीनी नेहा विकास चव्हाण हिने ९४ टक्के गुण प्राप्त करुन प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर अरमान अहेमद खान व रिषी कुमार यांनी ९३ टक्के प्राप्त करीत द्वितीय क्रमांक पटकाविला. तसेच धनंजय विकास चव्हाण याने ९२.८ टक्के तर वरद पुंडलिक पाटील याने ९१.२ टक्के गुण घेत यश संपादन केले. गुणवंत विद्यार्थ्यांचे गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका भारती महाजन यांच्यासह टिमने अभिनंदन करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.