पहुर. ता.जामनेर-येथील कोविड रुग्णालयात परराज्यातील तसेच परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना तसेच उसतोड कामगारांना तपासणी साठी येथे आणले जात आहे. ही संख्या जास्त असल्याने याठिकाणी सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडत आहे.
जळगाव येथील कोविड रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर रुग्ण संख्या वाढली आहे या कारणामुळे शासना तर्फे जिल्हाभरात विविध शासकीय रुग्णालयात कोविड रुग्णालये सुरू करण्यात आली आहे.परिणामी रुग्णांना सुविधा उपलब्ध झाली आहे.
जामनेर तालुक्यात जामनेर उप जिल्हा रुग्णालयात व पहुर ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णालये सुरू करण्यात आली असून या रुग्णालयात स्वँबचे नमुने सुध्दा घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पहुर येथील कोविड रुग्णालयात नुकतीच शेंदुर्णि येथील ११जणांचे स्वँबचे नमुने घेण्यात आले होते. त्या सर्व ११जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.पहुर येथील कोविड रुग्णालयात कोरोना संशयित रुग्णांची तसेच स्वँब नमुने तपासणी व नागरिकांना ईतर राज्य व जिल्ह्यात जाण्यासाठी तपासून दाखले देण्यात येत आहेत लाँकडाऊन मध्ये अडकलेल्या स्थलातंरीत कामगार,उसकामगार,यात्रेकरू, विद्यार्थी व इतर नागरिकांना त्यांच्या राज्यात, जिल्ह्यात जाण्यासाठी केंद्र सरकारने अटी व शर्थीनुसार परवानगी दिली आहे.त्यांची तपासणी करून त्यांना दाखले देण्यात येत आहेत.यामुळेच येथे नागरिकांची गर्दी होत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चाँदा यांनी दिली.
कोरोनाने जगभर थैमान घातले असताना देशातील विविध राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला आहे. जिल्ह्यामध्ये कोरोनाने शिरकाव करीत कोरोना बाधीत रुग्णांची संख्येने५०शी ओलांडली आहे.
असे असले तरी कोरोना फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध कडक उपाययोजनांची अंमलबजावणी केली. त्यामुळे जिल्ह्यात सकारात्मक वातावरण कोरोना निवळण्यासाठी तयार झाले आहे.