दोन तासाची विशेष सूट मिळावी
जळगाव ;- भारतात व महाराष्ट्रात ४ मे पासून १७ मे पर्यंत तिसरे लॉक डाऊन सुरू झाले असून यामध्ये काही विशिष्ट अशा सवलती सुद्धा देण्यात आलेल्या आहे. त्यात उद्योगधंदे, व्यवसाय, नोकरी इत्यादीबाबत परंतु धार्मिक स्थळे व धार्मिक कार्यक्रमाबाबत कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही
रमजान पर्व सुरू असून याचा समारोप २४ किंवा २५ मे रोजी ईद च्या स्वरूपात होणार आहे. ईद म्हणजे पूर्ण महिन्याचे रोजे- उपवास केल्यानंतर त्याला अल्लाह- ईश्वर पारितोषिक देतो तो दिवस म्हणजे ईद होय आणि म्हणून जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पत्र -निवेदन देऊन मागणी केलेली आहे की या पवित्र रमजान मुळे आपणास विधान परिषदेवर निवडून जाता येणार आहे त्यामुळेच याच महिन्यात आपले मुख्यमंत्रीपद सुद्धा शाबूत राहील त्यामुळे या कोरोना विशाणुचा राज्य ,देश व विश्वातून नायनाट करायचा असल्याने रोजेदार ला पारितोषिक ईद च्या दिवशी मिळेल त्यासाठी त्याला ईदगाह मैदानावर आपल्या अटी व शर्ती सह म्हणजे शारीरिक अंतर ठेऊन, तोंडावर मास्क व सैनी टायज़र चा वापर या गोष्टी सह सकाळी सात ते नऊ या दोन तासात मुस्लिम समाजाने ईद गाह अथवा मशिदीमध्ये आपली ईद ची नमाज अदा करावी यासाठी विशेष सूट देण्यात यावी अशी मागणी केलेली आहे.
ईद ची नमाज व पारितोषिक
या मागणी ची पार्श्वभूमी सुद्धा अशी आहे की रोजेदार अल्ला ईश्वर कडे त्यादिवशी जी काही प्रार्थना करेल ही प्रार्थना अल्ला कबूल करतो आणि म्हणून सर्व मुस्लिम समुदाय त्यादिवशी हीच प्रार्थना करणार आहेत की या कोरोना रोगाचा संपूर्णपणे नायनाट कर म्हणून ईद साठी कृपया दोन तास अटी व शर्ती सह नमाजची परवानगी ईदगाह मैदानावर अथवा मशिदीमध्ये देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.