जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील अयोध्यानगरमध्ये किरकोळ कारणावरून एक व्यक्तीस दोन जणांनी वीट मारून तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत बेशुद्ध केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहन पांडुरंग अंबोरे (वय ४५, रा. हनुमान नगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. दि. ३० एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजता ते गल्लीतील पानटपरी येथे गेले होते. तेथे चंदन गायकवाड याने दारू पिण्याचे मागील पैसे दे म्हणत मोहन यास वीट मारून फेकली. नंतर चंदनचा काका धावत आला. त्याने मोहन यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खाली पाडले. डोक्याला मार लागल्याने मोहन अंबुरे बेशुद्ध झाले.
नागरिकांनी त्यास शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अंबुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चंदन गायकवाड व त्याचा काका यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.