यावल (प्रतिनिधी) : तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप व शिंदे गटाला १८ पैकी १५ जागा मिळाल्या. तर महाविकास आघाडीला तीन जागा मिळाल्या. आ. शिरीष चौधरी यांचा मतदारसंघ असूनही याठिकाणी त्यांचा प्रभाव चालला नाही.
सहकारी सर्वसाधारण मतदार संघात हर्षल पाटील, दीपक चौधरी, उमेश पाटील, राकेश फेगडे, सागर महाजन, पंकज चौधरी, संजय पाटील, मागासवर्गीय मतदार संघात नारायण चौधरी, महिला राखीव मतदार संघात कांचन फालक, राखी ब-हाटे, भटक्या विमुक्त जाती व विमाप्र वर्ग मतदार संघातून उज्जैनसिंग राजपूत, अनुसूचित जाती जमाती मतदार संघात दगडू कोळी, आर्थिक दुर्बल घटक मतदार संघात यशवंत तळेले, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघात विलास पाटील, सूर्यभान पाटील, व्यापारी मतदार संघात अशोक चौधरी, सय्यद युनूस सय्यद युसूफ, हमाल मापाडी मतदार संघात सुनील बारी हे विजयी झाले.