जळगाव (प्रतिनिधी) – एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील राजकीय हमरातुमरी जगजाहीर आहे. कालच एकनाथ खडसेंनी माझी पुन्हा राजकारणात येणाची इच्छा आहे. ‘मला महाराष्ट्राच्या राजकारणात रस आहे. त्यामुळे मला विधानपरिषदेवर संधी द्यावी’, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. खडसेंच्या या मागणीला आता गिरीश महाजनांचे पाठबळ मिळालं आहे. आज महाजनांनी खडसेंच्या उमेदवारीसाठी आग्रही भूमिका घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ‘एकनाथ खडसे यांना प्रदीर्घ राजकीय अनुभव आहे. विरोधी पक्षनेता तसेच मंत्री म्हणून त्यांनी उत्तम काम केले आहे. त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली तर आम्हाला विरोधीपक्ष म्हणून चांगले काम करता येईल’, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे. त्यामुळं विधानसभेचे तिकीट कापल्यानं नाराज होऊन बसलेल्या एकनाथ खडसेंची विधानपरिषदेवर वर्णी लागणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.