जळगाव ( प्रतिनिधी ) – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त धरणगाव शहर काँग्रेस कमिटीतर्फे आणि गोदावरी फाऊंडेशनच्या सहकार्याने गुरुवार दि.२० एप्रिल रोजी मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.
सुभाष दरवाजाजवळील परिहार कॉम्प्लेक्स येथे सकाळी १० वाजता शिबिरास सुरवात होईल. डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांद्वारे शिबिरार्थींची तपासणी होणार आहे. यावेळी हृदयाची सोनोग्राफी अर्थात मोफत टू डी इको तपासणीही केली जाणार आहे. तसेच ईसीजी कार्डिओग्राफ, मधुमेह, रक्तदाब तपासणीसह कान नाक घसा विकार, नेत्रविकार, हाडांचे-मणक्यांचे विकार, हृदयविकार, दारुमुळे उत्पन्न झालेले पोटाचे विकार, त्वचाविकार, मानसिक आजार, स्त्रियांचे विकार अशा विविध आजारांची तपासणी व उपचार केले जाणार आहे. धरणगाव वासियांनी या शिबिराचा लाभ घेऊन आरोग्याची तपासणी करुन घ्यावी असे आवाहन गोदावरी फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अनंत परिहार यांच्याशी ७७४४००९९५५ या क्रमांकावर संपर्क साधावा.