जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील घरातून ५ लाख ३२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहे. या संदर्भात एका संशयित महिलेवर जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सुनीता नरेंद्र मोरे ( वय – ४८ ) रा. राजमाती नगर जळगाव या महिला आपल्या परिवारासह राहायला आहे. १ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास राजमलती नगरात राहणारी स्वाती किशोर कांबळे या महिलेने घरातून पितळी डब्यात ठेवलेले ५ लाख ३२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याच्या संशय व्यक्त केला आहे. याबाबत सुनीता मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस स्टेशनला रविवारी १६ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता संशयित स्वाती किशोर कांबळे यांच्यावर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र बागुल करीत आहे.