जळगाव ( प्रतिनिधी ) – महानगरपालिकेतील शिक्षकांचे पगार आता शासकीय फंडातून होणार असून यासंदर्भात एक विशेष पत्र नगरपरिषद संचालनालय, मुंबईने राज्यातील सर्व आयुक्तांना पाठविले आहे. त्यामुळे शिक्षकांचा महत्वाचा प्रश्न निकाली निघण्याची चिन्ह असून शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे.
महानगरपालिका शिक्षकांचे पगार पूर्वी ५० टक्के मनपा आणि ५० टक्के राज्य शासन देत होते. आता पूर्ण पगार हा राज्य शासन स्वतःच्या फंडातून देन्याबाबत सकारात्मक विचार सुरु आहे. याबाबतचे पत्र नगरपरिषद संचालनालय, मुंबईचे सहायक आयुक्त प्रबोधन मवाडे यांनी राज्यातील सर्व आयुक्तांना पाठविले आहे. शिक्षकांचा पगार हा पूर्णपणे शासन फंडातून करावा का याबाबत अहवाल मागितला असल्याबाबत मनपा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मनपा शिक्षकांचे पगार आता शासकीय फंडातून निघाले तर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतचे ओझे कमी होणार आहे. त्यामुळे शिक्षकांचे पगार आता आगामी काळात नियमित होणार असल्यामुळे त्यांच्या आनंदाचे वातावरण आहे.