जळगाव (प्रतिनिधी) – शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे रविवारी २३ एप्रिल रोजी जळगांव जिल्हा दौऱ्यावर येत आहे. पाचोरा येथे स्वर्गीय आर.ओ.पाटील यांच्या स्मारकाच्या अनावरण तसेच मायकोरायझा लॅब उद्घाटन तसेच जाहीर सभेसाठी येणार आहेत.
या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी १५ व १६ एप्रिल रोजी शिवसेना जळगांव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत जळगांव व पाचोरा येथे येत आहे. दौरा यशस्वी करण्यासाठी जळगांव जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक यांनी आता पासूनच मेहनत घेऊन सभा यशस्वी होण्यासाठी कंबर कसली आहे, अशी माहिती शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख डॉ हर्षल माने, विष्णू भंगाळे, दिपक राजपूत, समाधान महाजन, महानंदा पाटील व निर्मल सिड्चे संचालिका वैशालीताई पाटील- सूर्यवंशी, महापौर जयश्री महाजन, महानगर प्रमुख शरद तायडे, युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया, विस्तारक चैतन्य बनसोडे, युवासेना जिल्हायुवाधिकारी निलेश चौधरी, चंद्रकांत शर्मा, पियुष गांधी यांनी कळविले आहे.