यावल ;- यावल पोलीस स्टेशन व यावल तहसील कार्यालयापासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या सांगवी बुद्रुक गांवात आज सकाळी भाजीपाला व इतर वस्तू विक्रेत्यांचा मोठा बाजार भरला त्यात सोशल डिस्टन्स पूर्ण खड्ड्यात घालून ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली, याकडे सांगवी बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामसेवक आणि तलाठी यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने कोरोना विषाणू घातक महामारी संदर्भात सांगवी बुद्रुक गांवात जनजागृती झालेली नाही का ? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून यावल तहसीलदार व यावल पोलीस यांनी कडक कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.








