चुंचाळे ता.यावल ;- शिरसाड ता.यावल येथील भुपेद्र राजपूत यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लाँकडाऊन शाळा बंद असल्याने घरीच रहावे लागत आहे यासाठी त्यांनी युट्युब द्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत ज्ञानदान करत आहे त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे याबाबत हल्ली लॉकडाउन असल्या मुले शाळा, कॉलेज बंद आहेत आणि परत कधी उघड़तील हे सांगता येत नाही. अशात मुलांच्या शिक्षणाची चिंता पालकांना होणे स्वाभाविक आहे. या सर्व बाबी लक्षात घेता विद्यार्थ्यांना शिक्षण मिळतं रहावं म्हणून काही ना काही पर्यायी उपाययोजना करता येईल का यावर विचार केल्यास ऑनलाइन शिक्षण हा पर्याय समोर आला पण त्यात सुद्धा कोर्सेस विकत घ्यावे लागतात.
अशी सर्व परिस्थिती असतानाच यावल तालुक्यातील शिरसाड येथील शिक्षक श्री भुपेन्द्र राजपूत यांनी विद्यार्थ्यांकरीता मोफत Youtube चैनल सुरु केलं आहे की त्यात सर्व विषय मोफत शिकविले जात आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा खुप फायदा होत आहे. सर्व शिक्षक व पालक वर्ग या उपक्रमाचं कौतूक करीत आहेत.
कुणालाही या चैनल ला भेट देवून सर्व विषय घरच्या घरी मोफत मधे शिकता येईल असे भुपेद्र राजपूत यांनी सांगितले








