जळगाव ;– आज ५ मे पासून जळगांव जिल्ह्यातील मद्य विक्रीची परवानगी दिली आहे. आज दिवसभरात सकाळपासून संध्याकाळ पर्यंत बहुतांशी दुकानांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती . मात्र काही ठिकाणी मास्क अथवा वाईनशॉप्सवर सॅनिटायझरचा वापर झाला नसल्याचे चित्र दिसून आले असून शारीरिक अंतर सुद्धा दिसून आले नाही . त्यामुळे १७ मे पर्यंत मद्य विक्री बंद ठेवावी अशी मागणी मणियार बिरादरीचे जिल्हाध्यक्ष फारूक शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यात म्हटले आहे कि जळगांव जिल्हा रेडझोन मध्ये असल्याने मद्य विक्री होत असल्याने त्याचा परिणाम कोविड-१९ हा आजार वाढण्याचा धोका निर्माण झालेला आहे. म्हणून दिलेले मद्य विक्रीचे आदेश मागे घेण्यात यावे अशी मागणी केली आहे .