जळगाव (प्रतिनिधी) – नवकार युवा प्रतिष्ठानच्या ढोल पथकाने महावीर जयंतीनिमित्त महावीर जन्मल्याणक महोत्सवात उत्कृष्ट असे सादरीकरण केले. यानिमीत्त निघालेल्या शोभायात्रेत ढोल, लेझीम, झांज नृत्याने उपस्थित समाजबांधवांचे लक्ष वेधून घेतले.
नवकार ढोल पथकाच्या युवक युवतींसह लहान मुलांनी देखील सहभाग घेतला. यात लयबद्ध आवाज, वेगवेगळ्या धून यासह फेटा, लाल कुर्ता, व्हाईट पायजमा या वेशभूषेत युवक युवतींनी लक्ष वेधून घेतले. सुरुवातीपासून अखेरपर्यंत लयबद्ध पद्धतीने शोभायात्रेत सुंदर सादरीकरण झाले. जैन मंदिर, टॉवर चौक, घाणेकर चौक, सुभाषचंद्र बोस चौक, सराफ बाजार, रथ चौक, सागर भवन मार्गे बालगंधर्व नाट्यगृह येथे शोभायात्रा निघाली होती. शोभायात्रेत उत्तम लेझीम, लयबद्ध झाँज पथक खेळताना लहान मुलेदेखील लक्ष वेधून घेत होती.
ढोल पथकाला शिवगंध ढोल पथकाने प्रशिक्षण दिले. तसेच, या ढोल पथकाचे माजी आ. सुरेशदादा जैन, अशोकभाऊ जैन, प्रदीप रायसोनी, समिती अध्यक्ष विनोद ठोले, स्वरूप लुंकड, पप्पू बाफना, अजय गांधी यांच्यासह मान्यवरांनी कौतुक केले. नवकार युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रिकेश गांधी, कार्याध्यक्ष आयुष गांधी, सिद्धार्थ डाकलिया, समकीत डाकलिया, दीपक निंबजिया यांच्यासह सदस्यांनी परिश्रम घेतले.