जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका भागात दूधात गोळ्या देवून विवाहितेवर झोपेत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी रामानंदनगर पोलीस स्टेशनला एका जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
विवाहितेने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार असे की, ती जळगाव शहरातील एका भागात राहायला आहे. जयदीप सुरेश पाटील याने ४ जानेवारी २०२२ ते ३ एप्रिल २०२३ या दरम्यान वेळावेळी गरम दूधात गोळ्या टाकून ते दूध विवाहितेला दिले, त्यानंतर झोपेत विवाहितेसोबत शारिरीक संबंध केले, हा प्रकार जेव्हा विवाहितेला कळाला, तेव्हा जयदीप याने विवाहितेला तिच्या मुलाचा व पतीचा खून करण्याची धमकी दिली. यादरम्यान जयदीप याने विवाहितेला मारहाण सुध्दा केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घडल्याप्रकाराबाबत विवाहितेने मंगळवारी रामानंदनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे, या तक्रारीवरुन जयदीप सुरेश पाटील याच्याविरोधात रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक रोहिदास गभाले हे करीत आहेत.